मुंबई : अभिनेत्री करूणा वर्मा यांनी घरात ठेवलेला चार बांगड्या चोरली गेल्याची तक्रारी केली होती. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी वर्मा यांच्या घरात काम करणाऱ्या २४ वर्षीय घर कामगार महिलेला अटक केली आहे. चोरी झाली त्यावेळी तिच्याशिवाय घरात कोणीच उपस्थित नसल्याचे वर्मा यांनी तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री करूणा वर्मा यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरातून चार सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या असून, त्यांची एकूण किंमत ८८ हजार रुपये आहे. तक्रारीमध्ये अभिनेत्रीने त्यांच्या घरातील घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्यानंतर त्यानंतर याप्रकरणी वर्मा यांच्या घरात काम करणाऱया महिलेला अटक केली.

बांगूर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री मालाड पश्चिम येथील एका इमारतीत राहतात. त्यांच्या आई-वडिलांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस असल्यामुळे आईने त्यांना २०१५ मध्ये बांगड्या भेट दिल्या होत्या. त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये एका उघड्या ड्रॉवरमध्ये त्या ठेवल्या होत्या. त्यांनी शेवटी ९ मार्च रोजी बांगड्या पाहिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ड्रॉवर तपासला असता त्यात बांगड्या सापडल्या नाहीत.सुमारे एका महिन्यापूर्वी वर्मा यांच्याकडे घरकामासाठी एक महिला येत असे. अभिनेत्री चित्रीकरणासाठी बाहेर गेल्यावर ती घरी एकटीच असायची. बांगूर नगर पोलिसांनी याप्रकरणी कामगार महिलेची चौकशी केली होती.

आठ महिन्यांपूर्वीच वास्तव्याला

अभिनेत्री करूणा वर्मा या आठ महिन्यांपूर्वीच मालाड येथील घरात रहायला आल्या आहेत. त्यांनी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यांच्या तक्रारीवरून बांगूर नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला होता. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी घरात काम करणाऱ्या महिले विरोधात संशय व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने पोलीसांनी अधिक तपास करून कामगार महिलेला अटक केली. तक्रारीनुसार चार बांगड्या असून प्रत्येक बांगडी ११ ग्रॅम वजनाची आहे. त्यांनी १७ मार्च रोजी याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल केल्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे. परिसरातील व इमारतीतील सीसी टीव्ही चित्रिकरणाची तपासणीही करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested 24 year old house worker for stealing jewelry from actresss karuna verma house mumbai print news sud 02