बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचने विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज कुंद्रा या प्रकरणात मुख्य आरोपी असून यापुढे एसआयटी संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात सहभागी असणाऱ्यांची संख्या वाढत चालत असल्याने क्राइम ब्रांचने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. एसीपी दर्जाचा अधिकारी या तपासाचं नेतृत्व करणार असून आतापर्यंत दाखल सर्व गुन्ह्यांचा तपास केला जाणार आहे.
पॉर्नची निर्मिती तसंच मोबाइल अॅपच्या माध्यमातून त्या प्रसिद्ध केल्याप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राने ‘हॉटशॉट्स’ अॅप डेव्हलप करण्यासाठी एक कंपनी सुरु होती. या अॅपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
नीरव मोदी, मेहुल चोक्सीप्रमाणे राज कुंद्राही देश सोडून फरार झाला तर?, मुंबई पोलिसांना भिती
नव्याने स्थापन केलेली एसआयटी पॉर्नोग्राफी प्रकरणात दाखल झालेले सर्व एफआयआर हाताळणार आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात वेगवेगळे एफआयआर, तक्रारी, अनेक पीडित आणि आरोपी असल्यानेच एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणीही आणि कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सर्व तक्रारी एसआयटीकडून हाताळल्या जाणार आहेत.
अटकेनंतर राज कुंद्रांनी पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडली भूमिका, म्हणाले, “तो कंटेट पॉर्न नाही तर…”
दरम्यान ७ ऑगस्टला मुंबई हायकोर्टाने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन यांनी केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला. जुलै महिन्यात दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून सुरुवातीला पोलीस कोठडीत असणारे दोघे आता न्यायालयीन कोठडीत आहेत.
“तो कंटेट पॉर्न नाही”
दरम्यान राज कुंद्रा यांच्या वकिलाने कुंद्रा यांना ज्या अश्लील चित्रपटांच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारामध्ये मोडत असल्याचा युक्तीवाद केला होता. कुंद्रा यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. हा कंटेट अश्लील प्रकारामध्ये मोडतो असा युक्तीवाद कुंद्रांच्या वकिलांनी केला होता.
नीरव मोदी, मेहुल चोक्सीप्रमाणे राज कुंद्राही देश सोडून फरार झाला तर?
मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या जामिनास विरोध दर्शवला होता. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार राज कुंद्राला जामीन मिळाल्यास तोदेखील नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीप्रमाणे परदेशात पळ काढण्याची भिती आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसंच राज कुंद्राच्या व्हाटस्अप चॅटवरून या प्रकरणाचा परदेशातही संबध असल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. शिवाय राज कुंद्राकडे ब्रिटनचं नागरिकत्व असल्याने कोर्टाने राज कुंद्राला जामीन दिल्यास तो परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.