बॉंलीवूडची आयटम गर्ल राखी सावंतही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे तिने जाहीर केले आहे.
उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून कॉंग्रेसचे गुरूदास कामत, शिवसेनेचे गजानन किर्तीकर, आम आदमी पक्षाचे मयांक गांधी आणि मनसेचे महेस मांजरेकर यांच्यासोबत राखीला लढत द्यावी लागणार आहे.
आपल्याला तिकिट मिळावे यासाठी राखीने मंगळवारी दिल्लीवारीही केली. मात्र, राखीला भाजपकडून तिकिट नाकारण्यात आले आहे.
लोकांसाठी मी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत आहे आणि मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देईन असा विश्वासही राखीने व्यक्त केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 26-03-2014 at 03:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant to contest lok sabha election from mumbai