मराठमोळी परंपरा जपण्यासाठी मुंबईमधील हॉटेल्समध्ये इतर पदार्थाच्या जोडीला मराठमोळे खाद्यपदार्थही उपलब्ध करावेत अन्यथा संबंधित हॉटेलविरुद्ध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक हॉटेलमध्ये मराठमोळे खाद्यपदार्थ उपलब्ध असलेच पाहिजेत. हॉटेल मालकांनीही महत्त्व लक्षात घेण्याची गरज आहे. मुंबईतील अनेक हॉटेल्समध्ये पंजाबी, राजस्थानी, गुजराथी असे विविध राज्यांतील खाद्यपदार्थ उपलब्ध केले जातात. मात्र तेथे मराठमोळे पदार्थ मिळत नाहीत. त्यामुळे हॉटेल मालकांशी याबाबतीत चर्चा करण्यात येणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2015 रोजी प्रकाशित
‘हॉटेलांमध्ये मराठमोळे पदार्थ उपलब्ध करा’
मराठमोळी परंपरा जपण्यासाठी मुंबईमधील हॉटेल्समध्ये इतर पदार्थाच्या जोडीला मराठमोळे खाद्यपदार्थही उपलब्ध करावेत अन्यथा संबंधित हॉटेलविरुद्ध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.

First published on: 18-05-2015 at 01:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restaurants in state must serve maharashtrian food