आपल्या ताब्यातील वाहन वाट्टेल त्या इमारतीत घुसवण्याचे प्रसंग फक्त चित्रपटातच घडत असतील, या समजात असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. रविवारी रात्री एका रिक्षा चालकाने कांदिवली पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थेट रिक्षा घुसवली. या रिक्षा चालकाला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या रिक्षा चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले.
रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कांदिवली पश्चिमेला स्थानकाच्याच बाहेर असलेल्या रस्त्यावरून चर्चगेटच्या दिशेच्या दरवाज्यातून एक रिक्षा थेट प्लॅटफॉर्ममध्ये शिरली. प्रथमदर्शनी या रिक्षा चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने ही घटना घडल्याचे दिसत होते. मात्र या रिक्षा चालकाला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली. या रिक्षा चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे लक्षात आले. सुदैवाने या घटनेमुळे कोणालाही इजा पोहोचली नाही. या रिक्षा चालकाला रेल्वे कायद्याचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw in kandivali railway station