मुंबई : ज्यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली होती, त्यांनीच पाठीत वार केला. हेच माझ्यासाठी लाजिरवाणे आहे, अशी खंत व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बोलत असताना फडणवीस यांनी काल शिंदे यांचा माईक खेचला उद्या काय खेचतील माहिती नाही अशा शब्दांत भाजप आगामी काळात शिंदे यांना फसवणार असे भाकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्तवले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेच्या महिला आघाडीची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये घेतली. काल शंभर टक्के बांधव होते, आज समोर शंभर टक्के भगिनी आहेत. अत्यंत प्रामाणिक आणि मोकळेपणाने सांगतो की शक्ती मिळाल्याचा अनुभव आला आहे. तुम्ही सर्वजणी अमाप कष्ट करत आहात. तुमच्या भावना व्यक्त करत आहात, अनेकांच्या डोळय़ांत अश्रू दिसत आहेत.

एका बाजूला गद्दार आणि दुसऱ्या बाजूला निष्ठावंत शिवसैनिकांच्या डोळय़ांतील अश्रू अशा रीतीने मी मध्ये उभा आहे. यामधून मला मार्ग काढायचा असून मार्ग तर नक्की काढणार, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena chief uddhav thackeray slammed fadnavis for snatching mic from cm shinde zws