मुंबई: सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईला घाबरणार नाही, त्यांच्या दबावापुढे वाकणार नाही आणि घाबरून शिवसेनाही सोडणार नाही, असा निर्धार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांना ईडीचे अधिकारी नेत असताना त्यांचे कुटुंबीय भावुक झाले होते.
ईडीचे अधिकारी राऊत यांच्या घरी आल्याचे वृत्त कळल्यानंतर शिवसैनिक घराबाहेर जमा झाले होते. त्यांना नेत असताना शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ईडीने माझ्याविरोधात खोटे पुरावे तयार करून कारस्थान रचून कारवाई केली आहे. ही कारवाई खोटी आहे. मी या कारवाईला घाबरत नाही, भीतीने त्यांच्यापुढे वाकणार नाही आणि ईडीची कारवाई झाल्यावर किंवा त्या भीतीने इतर नेते जसे भाजप-शिंदे गटात दाखल झाले तसे करणार नाही. शिवसेना सोडणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.