मुंबई : रक्षाबंधनाचे महत्त्व आपल्याकडे फार पूर्वीपासून आहेत. इतिहासात अनेक भावांनी आपल्या बहिणींचे रक्षाबंधनाच्या निमित्ताने रक्षण केल्याची उदाहरणे आहेत. आत्ताच्या आधुनिक काळात हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडलेल्या एका बहिणीने रुग्णालयात जाऊन तेथे आपल्या भावाला रखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले तेव्हा उपस्थित डॉक्टरही भावूक झाले.

मुंबईतील सायरा पठाण ही १३ वर्षाची मुलगी सुट्टीत उत्तर प्रदेशातील अलीगढ या तिच्या मूळ गावी २०२२ मध्ये गेली होती. तेथे तिच्या चुलत भावांसोबत खेळत असताना, तिने चुकून टेरेसवरील केव्ही क्षमतेच्या तारेला स्पर्श केला. परिणामी विजेचा जोरदार धक्का बसला ज्यामुळे ती भाजली तसेच तिचा उजवा हात कापावा लागला. तसेच तिच्या डाव्या हातालाही इजा झाली होती, डावा हातही फक्त २० टक्के काम करत होता.

तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच २०२४ मध्ये या मुलीवर मुंबईतील ग्लेनईगल्स हॉस्पिटल येथे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले होते. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वयाच्या पंधराव्या वर्षी सायराला सूरत येथील ९ वर्षांच्या मेंदूमृत दात्याकडून हात मिळाला, जो आजपर्यंत देशातील सर्वात तरुण दाता ठरला आहे. अँप्युटीजसाठी हात प्रत्यारोपण हा जीवन बदलणारा पर्याय आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या हातांचा पूर्वीप्रमाणे वापर करता येतो आणि स्वातंत्र्य मिळते.

कृत्रिम हाताने बांधलेली तिची ही पहिली राखी

विजेचा धक्का लागून हात गमावल्यावर काही काळाच्या प्रतिक्षेनंतर मुंबईतील ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये सायरा हिच्यावर खांद्याच्या स्तरापासून यशस्वीरित्या हात प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ती जगातील सर्वात तरुण प्राप्तकर्ती ठरली आहे. अनामता आता १६ वर्षाची झाली असून तिने आपल्या या कृत्रिम हाताने पहिल्यांदाच रक्षाबंधाचा सण साजरा करत बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेली राखी आपल्या भावाच्या हातावर बांधली.

याप्रसंगी बोलताना सायरा सांगते की, आपल्या शरीरातील एखादा अवयव गमावलेल्या व्यक्तीसाठी प्रत्यारोपण हा एक जीवन बदलणारा पर्याय ठरत आहे, कारण यामुळे त्यांना त्यांच्या अवयवांचा पूर्वीप्रमाणे वापर करता येतो आणि जगण्याचे स्वातंत्र्य मिळते तसेच दैनंदिन कामाकरिता इतरांवर अवलंबून रहावे लागत नाही. हात प्रत्यारोपणानंतर पहिल्यांदाच मी रक्षाबंधनाचा सण साजरा करत असून मी स्वतःच्या हाताने भावाला राखी बांधु शकतेय याचा मला खुप आनंद झाला आहे.

अशाच दुसऱ्या एका प्रकरणात २०१४ साली रेल्वे अपघातात रेखा जाधव या तरुणीन दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया ऑगस्ट २०२० रोजी करण्यात आली होती. परेलच्या ग्लेनईगल्स हॅास्पीटलमध्ये पश्चिम भारतातील पहिले दुहेरी हात प्रत्यारोपण करणात आले. आज हिच तरुणी इतर रुग्णांकरिता प्रेरणादायी ठरली असून जगण्यासाठी तिच्यासारखी लढाई लढणाऱ्या रुग्णांसाठी ती आशेचा किरण ठरत आहे. ती या रुग्णांने भेटते, त्यांच्या समस्या ऐकुन घेते, त्यांना आपल्या कुचुंबाप्रमाणेच आधार देते, जगण्यासाठी प्रोत्साहन देते कारण भूतकाळा ती देखील याच प्रवासातून गेली आहे.

या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मोनिकाने ग्लेनईगल्स हॅास्पीटलमधील तरुण यकृत प्रत्यारोपण प्राप्तकर्त्यास रेखा जाधव हिने राखी बांधली. या जीवन- मृत्युच्या लढाईत कोणालाही कधीही एकटे लढावे लागणार नाही याची जाणीव करुन देत अनोख्या पध्दतीने रक्षाबंधनाचा सण याठिकाणी साजरा करण्यात आला. मी आता माझ्या दोन्ही हातांनी वस्तू उचलू शकते, अंगठ्याचा वापर करून मोबाईलवर मेसेज टाईप करू शकते, मी माझ्या हातांवर मेहेंदी काढू शकते, कागदावर चित्र काढू शकते, स्वयंपाक करू शकते आणि नवीन हातामुळे मला माझा आत्मविश्वास परत मिळाला आहे.

माझ्यासारख्या परिस्थितून जाणाऱ्या रुग्णांना मला सर्वच स्तरांवर आधार द्यावासा वाटतो. आयुष्याची ही लढाई त्यांना न डगमगता लढाईची असून अशा रुग्णाची भेट घेऊन मी त्यांचे मनोबल वाढवते.आज रक्षाबंधनाच्या दिवशी मी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाला राखी बांधून या लढाईत तो एकटा नाही हे माझ्या भावाला सांगितल्याचे रेखा म्हणाली.