प्रशासनात सुव्यवस्था आणि पारदर्शकता निर्माण होण्यासाठी तसेच प्रशासकीय माहिती अद्ययावत स्वरूपात जनतेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक संकेत स्थळे उपलब्ध आहेत. या संकेत स्थळावरील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
 ई-प्रशासन पुरस्कार सोहळा आणि नवीन माहिती तंत्रज्ञान प्रकल्पाचे अनावरन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहावर पार पडले. या वेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे भागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते. ई-चावडी, ई-सातबारा, ई-टेंडरींग आदी उपक्रमांमुळे महसूलात वाढ होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.