“अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं असं अचानक आपल्यातून निघून जाणं माझ्यासाठी धक्कादायक आहे. मला काहीच कळत नाहीय” अशी प्रतिक्रिया अभिनेत्री प्रिया मराठे यांनी दिली. प्रिया मराठे आणि सुशांत सिंह राजपूत यांनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सुशांतच्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. तो एक अत्यंत हुशार, समर्पणवृत्तीने काम करणारा कलाकार होता. आपल्याला पुढे जाऊन काय कारयचं आहे, चित्रपटात काम करायचं आहे, हे त्याला ठाऊक होतं. त्यावेळी आम्ही हा विचारही केला नव्हता. तो खूप शार्प आणि हुशार होता” असे प्रिया मराठे यांनी सांगितले. त्या एबीपी माझा वृत्त वाहिनीवर बोलत होत्या.

“सुशांतच्या मेकअप रुममध्ये त्याची स्क्रिपट, पुस्तक असाय़ची. तो पुस्तक भरपूर वाचायचा” असे प्रिया मराठेने सांगितले. “सेटवर प्रत्येक सीनवर त्याची कमांड होती. सीनमधलं एखादं वाक्य पाठ नाही असं त्याच्याबाबतीत कधीचं झालं नाही” असे प्रियाने सांगितले. “पवित्र रिश्ताच्या सेटवर आमच्यात चांगल मैत्रीचं नातं तयार झालं होतं. तो खूप चांगला, प्रेमळ माणूस आणि सहकलाकार होता” अशा आठवणी प्रिया मराठे यांनी सांगितल्या.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput suicide is shocking news for me priya marathe dmp