मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी या भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहक अशा गुलाबी फुलझाडांना बहर आला आहे. टॅब्यूबिया असे नाव असलेल्या या झाडांच्या गुलाबी फुलांमुळे सध्या विक्रोळी परिसर बहरला आहे. वसंत ऋतूत येणाऱ्या या फुलांना हा मार्ग सुशोभित केला आहे. पूर्व द्रुतगती मार्गाच्या मध्यभागी दुभाजकावर मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी विविध फुलझाडे लावली होती. या झाडांमध्ये ‘बसंत रानी’ या प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> एसटी भाडेवाढ तत्काळ मागे घ्या; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मागणी

सुमारे २५ ते ३० फुट उंच असणा-या ह्या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. यावेळीही छेडा नगर ते विक्रोळी या भागात असलेली झाडे बहरली आहेत. गेली सहा सात वर्षे ही फुलझाडे या ऋतूत बहरतात. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना मोहक दृश्य पाहायला मिळते. महापालिका क्षेत्रात सुमारे २९ लाख ७५ हजार २८३ एवढे वृक्ष आहेत. यामध्येच ६ हजार ५०० पेक्षा अधिक ‘बसंत रानी’ वृक्षांचाही समावेश आहे. हिंदी भाषेत ‘बसंत रानी’ अशी ओळख असणा-या या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव ‘टॅब्यूबिया पेंटाफायला’ (Tabebuia Pentaphylla / Tabebuia Rosea) असे आहे. तर याच झाडाला इंग्रजीमध्ये ‘पिंक ट्रंम्पेट, पिंक पाऊल, पिंक टिकोमा’ या नावांनीही ओळखले जाते, अशी.माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tabebuia rosea trees bloom along vikhroli highway mumbai print news zws