करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य सरकारने जमावबंदी लागू के ली, मात्र लोक अजूही रस्त्यावर घोळक्याने फिरताना दिसत आहेत, त्याबद्दल चिंता व्यक्त करीत, या आजाराचा धोका गांभीर्याने घ्या, योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील नागारिकांना के ले आहे.
करोना विषाणूविरोधातील लढाई आपण जिंकणारच आहोत, परंतु गरज आहे संयम, समंजसपणा आणि योग्य त्या दक्षता घेण्याची. मला विश्वास आहे याबाबत गांभीर्याने दक्षता घ्याल, असा विश्वासही त्यांनी के ला.
करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची गांभीर्याने नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अजूनही अनेक शहरात व काही ठिकाणी लोक रस्त्यावर घोळक्यांनी बघायला मिळत आहेत, याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली. करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आपणही गांभीर्याने घ्यायची गरज आहे. अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडा. केंद्र व राज्य सरकारने जे आवाहन केले आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी व सरकारी यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले आहे.