मोठे नाले, उपनाले, पर्जन्य जलवाहिन्या यांमधून वाहणारे सांडपाणी रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्र दुषित होण्यास कारणीभूत ठरणारे हे प्रवाह बंद करणे, अन्यत्र हलवणे या कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- मुंबई: म्हाडाच्या घरांसाठी एकच नोंदणी सेवा गुरुवारपासून; कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करण्याची सुविधा

मुंबई शहर आणि उपनगरात मिळून एकूण २९ मोठे नाले आहेत. हे नाले व उपनाले खाड्या आणि समुद्रात विलीन होतात. तसेच पर्जन्य जलवाहिन्यांमधील पाणीही समुद्राला जाऊन मिळते. पावसाळा संपल्यानंतरही हे नाले, पर्जन्य जलवाहिन्या यामधून सांडपाणी समुद्राला जाऊन मिळते. प्रक्रिया न केलेल्या या सांडपाण्यामुळे समुद्र दूषित होत असतो. मुंबईतील नद्या, तलाव किंवा खाडी यामध्ये बिनपावसाळी प्रवाह, प्रक्रिया न केलेले सांडपाणी, अर्धवट प्रक्रिया केलेले मलप्रवाह समुद्राला जाऊन मिळत असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूुषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला यापूर्वीच सांगितले आहे. तसेच यापूर्वी महानगरपालिकेला त्याकरिता दंडही केला होता. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता समुद्र दुषित होण्यास कारणीभूत ठरणारे हे प्रवाह बंद करणे, अन्यत्र हलवणे या कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता सल्लागार नेमण्यात येणार आहे. या कामांसाठी महानगरपालिकेने निविदा मागवल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती सल्लागाराची निवड करण्यात आली असून या कामासाठी महानगरपालिका सल्लागाराला पावणे दोन कोटी रुपये देणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mumbai municipal corporation will prepare a detailed project report to divert the flow of drains polluting the sea mumbai print news dpj