मनसेचे नगरसेवक प्रकाश दरेकर व नगरसेविका सुखदा पवार आणि काँग्रेस नगरसेविका केसरबेन पटेल यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता मनसे, काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश सुरू केले आहेत. भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार, जिल्हाध्यक्ष आमदार अमित साटम आदींच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, चांदिवली येथील नगरसेविका सरिता पवार यांचे पती शरद पवार व त्यांचे बंधू संतोष पवार यांच्याविरोधात पाणीचोरी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांना मित्रपक्षांनी संरक्षण देऊ नये, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2016 रोजी प्रकाशित
तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता मनसे, काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश सुरू केले आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-05-2016 at 02:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three councillors enter in bjp