मुंबई : टोरेस फसवणूक प्रकरणात फरार आरोपींनी परदेशात निधी पाठवण्यासाठी कूट चलन ऑपरेटरच्या मोठ्या जाळ्याचा वापर केल्याचा संशय आहे. याप्रकरणी हवाला ऑपरेटर अल्पेश खारा याच्या कूट चलन खात्यांची फाइनान्शियल इंटेलिजन्स युनिटच्या (एफआययू) माध्यमातून तपासणी करण्यात आली. पण, त्यात कोणतेही व्यवहार झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, खाराने त्यासाठी इतर शेकडो कूट चलन वॉलेटचा वापर केल्याचा संशय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय यंत्रणांनी फरार युक्रेनियन नागरिकांनी चालवलेल्या अत्यंत गुप्त आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही टोळी खूप गोपनीय पद्धतीने परदेशात रक्कम पाठवत होती. त्यामुळे तपास यंत्रणांना फसवणूक केलेल्या निधी परदेशात पुढे कोठे गेला याची माहिती मिळवणे अवघड झाले आहे.

हवाला ऑपरेटर असलेला अटक आरोपी अल्पेश खाराच्या आर्थिक व्यवहारांचे तपशील फाइनान्शियल इंटेलिजन्स युनिट (एफआययू)कडे पाठवण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत, अंदाजे १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम विविध क्रिप्टो वॉलेट्सद्वारे ‘यूएसडीटी’ (टिथर कूट चलन)मध्ये रूपांतरित करून युक्रेनियन आरोपींना पाठवली गेली असल्याचा संशय आहे. पण, एफआययूच्या तपासातही अल्पेश खाराकडे याच्या कूट चलन खात्यातून कोणतीही रक्कम हस्तांतरीत झालेली नाही.

रक्कम हस्तांतरणाची कार्यपद्धती

तपासादरम्यान खारा स्वत: फसवणूक निधीचे थेट क्रिप्टोमध्ये रूपांतर करत नव्हता. त्याने विविध हँडलर, मध्यस्थ आणि दलाल यांच्या माध्यामतून हे जाळे उभे केले होते. त्यात छोट्या छोट्या रकमेत कूट चलन परदेशात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा माग काढणे कठीण झाले आहे. ईडीच्या तपासानुसार, खाराने ‘व्हॉट्सअॅप’ आणि ‘टेलिग्राम’वर गुप्त गट तयार करून रोख रक्कम संकलन, हस्तांतरण आणि रूपांतराचे नियोजन केले होते. यामधून खाराने टोरेस ज्वेलरीच्या दादर येथील शोरूमच्या कर्मचाऱ्यांना एन्क्रिप्टेड संदेश पाठवून, त्याच्या नेमलेल्या एजंटांना ठराविक रक्कम सोपवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कामासाठी खाराला आरोपी अलेक्सकडून दोन टक्के कमिशन मिळत होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torres fraud case suspected using large hawala network to send funds overseas zws