अंधेरी येथे नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून मंगळवारी रात्री आठपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. मार्ग, जे. पी. मार्ग, म्हातार पाडा, सीझर मार्ग, वीरा देसाई मार्ग, शाह इंडस्ट्रियल इस्टेट, केव्हणी पाडा, माल्कम बाग, नवरंग सिनेमा परिसर, आंबोली, आझादनगर, भवन्स परिसर, टेप व्हिलेज, अंधेरी गावठाण, गावदेवी, डोंगरी, गिल्बर्ट हिल, जुहू गल्ली, डी. एन. नगर, चार बंगला, सात बंगला, वर्सोवा लिंक रोड, मनीषनगर, रतननगर, मॉडेल टाऊन, मोरागाव व जुहू गावठाण परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कांदिवली येथील आकुर्ली रोडजवळील जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सोमवारी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच या वेळेत कांदिवली-मालाड परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. कांदिवली पूर्वेचे हनुमाननगर व मालाड पूर्व येथील आप्पापाडा, क्रांतीनगर, साईबाबानगर, गोकुळनगर, गांधीनगर व भीमनगर येथील पाणीपुरवठा दुरुस्तीदरम्यान बंद राहणार असून सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यानंतर पूर्ववत केला जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
कांदिवली, मालाड, अंधेरीत पाणीकपात
अंधेरी येथे नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून मंगळवारी रात्री आठपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
First published on: 14-02-2014 at 03:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut in kandivli malad and andheri