मुंबई : भांडुप पश्चिम परिसरातील क्वारी रोड येथील संभाजी चौक परिसरात राज बुकडेपो समोर जलवाहिनीतून अचानक पाण्याची गळती होऊ लागली असून त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या एस विभाग कार्यालयातील जलकामे खात्याने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे भांडुपमधील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भांडुप येथील गोपालदास हॉटेल, एल. बी. एस. रोड, भांडुप पश्चिम येथील जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भांडुपसह विक्रोळीतील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. प्रतापनगर रोड, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक नगर, काजू टेकडी, एकता पोलीस चौकी, सूर्य नगर, चंदन नगर, गांधी नगर, विक्रोळी पश्चिम, एल. बी. एस. मार्गावरील औद्योगिक वसाहती, टागोर नगर विक्रोळी पूर्व येथील पाणीपुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply stopped in bhandup water leakage mumbai municipal corporation mumbai print news ysh