मुंबई : वांद्रे पूर्व परिसरातील एका सोसायटीमधील शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. निपुणा शर्मा (४१) असे या महिलेचे नाव आहे. वांद्रे पूर्व येथील शास्त्री नगर परिसरातील ‘सस्टोन’ इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. खाजगी गृहनिर्माण संस्थेची ही इमारत असून या इमारतीमधील शौचालयाच्या टाकीत मंगळवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास निपुणा पडल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि निपुणा यांना शौचालयाच्या टाकीतून बाहेर काढण्यात आले. तात्काळ त्यांना गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-01-2023 at 11:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman dies after falling into toilet tank incident in private society mumbai print news ysh