भारतीय संविधानावरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी भाजप व शिवसेनेला दिला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातीतून संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द वगळले. त्यावरुन आता राजकीय वाद पेटला आहे. रिपब्लिकन पक्ष हा राज्यात भाजपचा मित्र पक्ष आहे. मात्र आठवले यांनी त्या जाहिरातीतून धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द वगळल्याबद्दल केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. संविधानाच्या सरनाम्यातील हा केवळ शब्द वगळण्याचा प्रश्न नाही तर, हा संविधानिक मुल्यांवर हल्ला आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2015 रोजी प्रकाशित
’संविधानावरील हल्ला खपवून घेणार नाही’
भारतीय संविधानावरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी भाजप व शिवसेनेला दिला आहे.

First published on: 30-01-2015 at 02:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wont tolerate attack on constitution ramdas athawale