नागपूर : राज्याच्या गृहमंत्रालयाकडून कारागृह रक्षकांची लवकरच भरती केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार असताना अवघ्या १८०० जागांसाठी तब्बल पावणेचार लाख अर्ज आले आहेत. पोलीस दलातील अन्य पदांसाठीही लाखोंच्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात कारागृह रक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच कारागृहातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> चंद्रपूर : उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील अटकेत; दोन दिवसांची पोलीस कोठडी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 75 lakh applications received for 1800 jail constable posts in maharashtra zws
First published on: 15-05-2024 at 02:32 IST