विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.. अशी एक म्हण आहे, पण प्रत्यक्षात ते पहायला मिळेलच असे नाही. मात्र, अस्वलाचे पाठीवरील बिऱ्हाड म्हणजे अविस्मरणीय दृश्य. ते प्रत्येकालाच दिसेल असे नाही. तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला येथे एक अविस्मरणीय दृश्य दिसू शकते, ते म्हणजे पिल्लांसहित असलेल्या अस्वलमादीचे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मदनापूर बफर क्षेत्रात वन्यजीव अभ्यासक अरविंद बंडा यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>“अमित शाह उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात,” चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “त्यांनी यासाठी..”

पिल्लांसह असलेली अस्वलमादीचे दृश्य बघणे हे वर्णनातीत असते, कारण मादी आपल्या पिल्लांना पाठुंगळी घेऊन हिंडत असते. मध्येच पिल्लांचे तिच्या पाठीवरुन उतरणे, परत तिच्या पाठीवर बसण्याची चढाओढ बघायला फार मजा येते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मदनापूर प्रवेशद्वाराजवळ बफर क्षेत्रात वन्यजीव अभ्यासक अरविंद बंडा यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. सहसा शांत असलेली ही अस्वले ही प्रसंगी खूप हिंसक होतात. त्यामुळे ह्यांच्या जवळ न जाणेच हिताचे. मात्र, वन्यप्राण्यांच्या वेगवेगळ्या मुद्रा त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात नेहमीच यशस्वी ठरणारे अरविंद बंडा यांचे नशीब याबाबतही जोरावरच होते. दोन पिल्लांसह बाहेर आलेल्या मादीचे दृश्य त्यांनी टिपले. सुरुवातीला या दोन्ही पिलांनी आईच्या पाठीवर मस्त ठाण मांडले होते. त्यानंतर मात्र त्यांची घसरण सुरू झाली. आईच्या पाठीवर बसण्यासाठी त्यांची चढाओढ डोळ्याचे पारणे फेडणारी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A bear with its cubs on its back was spotted in the madnapur buffer area of the tadoba andhari tiger project rgc 76 amy