अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूरमधील पठाणपुरा परिसरातील एका गायीला ‘लम्पी’ त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले. त्याचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानुसार संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्र बाधित घोषित करण्यात आले आहे. याचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विजय पाटील यांनी निर्गमित केला. ‘लम्पी’च्या प्रादुर्भावामुळे पशुपालक चिंतेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – गोंदिया : संतप्त शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र काढली आमदारांच्या घरासमोर; जोपर्यंत धानाचे चुकारे मिळणार नाही तोपर्यंत..

हेही वाचा – यवतमाळ : महिनाभरापूर्वी अतिवृष्टी अन् आता पावसाची ओढ; पिकांचे नुकसान, उत्पन्नात घट होण्याची भीती

प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार मूर्तिजापूर येथील पठाणपुरा परिसरातील संसर्ग केंद्रापासून १० किमी बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, ५ किमी परिघातील जनावरांना लसीकरण तत्काळ करण्यात यावे, असे आदेश जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाला देण्यात आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A cow in pathanpura area of murtijapur in akola district was found to be infected with lumpy ppd 88 ssb