बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात काल मध्यरात्री नंतर झालेल्या एका दुर्घटनेत एका बिबटयाचा मृत्यू झाला. यामुळे वन्यजीव विभागसह खामगांव परिसरात खलबळ उडाली आहे .
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या खामगाव-चिखली रस्त्यावर गणेशपूरजवळ गुरुवारी रात्री १ वाजताच्या ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मध्यरात्री नंतर एक वाजताचे सुमारास रस्ता ओलांडताना एका बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली . त्यामुळे बिबटचा जागीच मृत्यू झाला.
गणेशपूर परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे . अनुकूल परिस्थिति मुळे या परिसरात वन्य प्राणी नेहमीच दिसतात. रात्री शिकार वा पाण्यासाठी रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. धडकेमुळे बिबट्याचा मृत्यू झाला. दरम्यान आज गुरुवारी , १२ जून रोजी पहाटे वाजता गस्त घालत असताना हिवरखेड पोलीस ठान्याच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळाली.
हिवरखेड पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तत्काळ वन विभागाला घटनेची माहिती दिली. काही वेळातच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड आणि वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पंचनामा केला. त्यानंतर, बिबटयाचा मृतदेह खामगाव येथील वन विभाग कार्यालयात नेण्यात आला. त्याचे खामगांव पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.