वर्धा : पुलगाव लगत इंझळा येथील जावंदिया कुटुंबात ही घटना घडली. संपत्तीच्या वादातून दोन सख्या भावांनी मिळून चुलत भावाचा खून केला. मनोज ललित जावंदिया असे मृतचे नाव असून सतीश विनोद जावंदिया व सुमित विनोद जावंदिया अशी आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतजमिनीच्या हिस्से वाटणीवरून या दोन कुटुंबात वाद सुरू होता. त्यातून मनोज हा नेहमी विनोद यांच्या कुटुंबाशी वाद उकरून काढत होता. दहशत निर्माण करायचा. त्याच्या विरोधात अनेक गुन्हेही दाखल झाले होते. घटनेच्या दिवशी सतीश व सुमित हे भाऊ शेतात गेले होते. त्या ठिकाणी मनोजही पोहोचला. या ठिकाणी चांगलाच वाद झाला.

हेही वाचा – सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही! पीक विमा धोरण शेतकऱ्यांना संकटात टाकणारे-विरोधकांची टीका

हेही वाचा – वर्धा : एकही दिवस सुट्टी न घेणारे असेही एक ग्रामदानी गाव…

वाद विकोपास गेल्यावर दोन्ही भावांनी मिळून मनोजवर लोखंडी सब्बलने वार केले. त्यात तो जागीच ठार झाला. यावेळी मृत मनोजची आईपण हजर होती. त्यांनीच पुलगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दोन्ही भावांना अटक करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A murder incident took place in the javandia family of inzla near pulgaon pmd 64 ssb