नागपूर : उड्डाण पुलावरून भरधाव आलेल्या कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वार युवक पुलाखाली पडून मृत्यू पावला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. ही घटना हल्दीराम टी पॉईंटजवळ घडली. मृत युवकाची ओळख पटली नाही. या अपघातामुळे उड्डाण पुलावरील वाहतूक जवळपास अर्धा तास विस्कळीत झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राप्त माहितीनुसार, दोन युवक दुचाकीने (एमएच ३१ सीई ६३६६) काटोल रोडवरून सदरकडे जात होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास उड्डाण पुलावरून जाताना हल्दीराम टी पॉईंटजवळ राँग साईडने भरधाव आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी जवळपास १०० मीटरपर्यंत घासत गेली. त्यानंतर पुलाच्या कठड्याला धडकली. सुरक्षा भिंतीला धडक बसल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीच्या मागे बसलेला युवक उड्डाण पुलावरून खाली पडला. गंभीर जखमी युवकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – नाना पटोले म्हणतात, “‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ला विरोध नाही, मात्र निवडणुका…”

हेही वाचा – रेल्वेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अतिरिक्त १५ कोटी २६ लाख का मोजले?

या अपघातानंतर उड्डाण पुलावर मोठी गर्दी झाली. तर अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी गर्दी पांगवली आणि वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कारचालकाला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A speeding car hit a two wheeler in nagpur a youth fell from the flyover adk 83 ssb