घाटंजी तालुक्यातील टिटवी परिसरातील जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. कर्णजी पेंदोर (६०, रा. टिटवी) असे जखमी गुराख्याचे नाव आहे.कर्णजी शनिवारी दुपारी गाईंची राखण करत असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील शेतात काम करणारे लोकं जंगलाच्या दिशेने धावले. तेव्हा कर्णजी वाघाच्या तावडीत असल्याचे बघून अनेकांना घाम फुटला.
हेही वाचा – गडचिरोली : सावधान! घराबाहेर पडू नका, गावात वाघ आलाय…
नागरिकांनी आरडाओरड करून वाघाला हुसकावून लावले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पेंदोर यांना अत्यवस्थ अवस्थेत प्रथम घाटंजी व तेथून यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. टिटवी परिसरात टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा संचार असल्याने वनविभागाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.