जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बल्लारपूर ते हैदराबाद रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वेच्या धडकेत वाघाच्या शरीराचे दोन तुकडे झाले. बुधवारी सकाळच्या सुमारास गँगमन रेल्वेरुळाची तपासणी करीत असताना ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर, वनरक्षक संजय जाधव वनमजुरांसह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tiger died in a train collision in chandrapur amy