बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकीट दरात सवलतीनंतर महामेट्रोने आता पदवी, पदविका, आयआयटी अभ्यासक्रम, पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांनाही ३० टक्के सवलतीचा निर्णय घेतला. सोमवार, १३ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महा मेट्रोने ७ फेब्रुवारीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकीट दरात ३० टक्के सवलत दिली. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा मेट्रो प्रवासाकडे वळले. त्यामुळे आता महामेट्रोने बारावीच्या पुढे पदवी, पदविका, आयआयटी व पॉलिटेक्निक व इतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ३० टक्के सवलतीचा निर्णय घेतला. मेट्रो स्टेशनवरील तिकीट खिडकीवर महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र दाखवून विद्यार्थी ३० टक्के सवलतीच्या दरात तिकीट खरेदी करू शकतील.

हेही वाचा – शरद पवारांचा वर्धा दौरा, ‘मोहितेमय’ वातावरण अन् गटबाजीचे सावट…

हेही वाचा – “लेट मी टच यू..”, सुनील गावसकर यांनी सांगितला अवाक करणारा किस्सा

मेट्रोतून प्रवासासाठी असलेल्या प्रत्येक किमीच्या टप्प्यासाठी ही सवलत राहणार आहे. रोख, तसेच महाकार्डचा वापर करणाऱ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. महाकार्डची सेवा देणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने सॉफ्टवेअरमध्ये नव्या सवलतीनुसार सुधारणा केली असून, सोमवारपासून महाकार्डधारकही सवलतीचा लाभ घेऊ शकणार आहे. शाळा, कॉलेजचे ओळखपत्र दाखवून विद्यार्थी स्टेशनवरून महाकार्ड मिळवू शकतील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After school students now nagpur metro discount for graduates diploma holders cwb 76 ssb