वर्धा : शास्त्रीय नृत्याने विदेशातील रंगमंच गाजविणारी अर्णवी आता राष्ट्रीय विक्रम स्थापन करण्यासाठी सिद्ध झाली आहे. चन्नावार्स इ विद्यामंदिरात तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अर्णवी सागर राचर्लावार या चिमुरडीचा नृत्याविष्कार चकीत करणारा ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून भरतनाट्यमचा सराव करणाऱ्या अर्णवीने गत पाच वर्षांत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार खेचली आहेत. लघुपट व नृत्य अल्बममध्ये बालकलाकाराची भूमिका करणाऱ्या अर्णवीची निवड रशिया व दुबईतील नृत्य स्पर्धेसाठी झाली होती.

हेही वाचा – नागपूर : वीज प्रकल्पाबाबत ‘भाजपा’मध्ये मतभेद! फडणवीस, बावनकुळे कोराडीच्या बाजूने, तर गडकरी, रेड्डींचा पारशिवनीसाठी आग्रह

आग्रा येथे संपन्न आंतरराष्ट्रीय ताज रंगमहोत्सवात तिला पुरस्कार प्राप्त झाला. मुंबईत आयोजित स्पर्धेत कलारत्न, तसेच अन्य पुरस्कार तिच्या खात्यात जमा आहे. आता भरतनाट्यम या नृत्य प्रकारात आतापर्यंत केलेल्या नृत्याच्या कालावधीचा विक्रम मोडण्यासाठी ती सज्ज आहे. ४ जूनला सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता ती नृत्य सादर करणार आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ ही संस्था यावेळी तिच्या नृत्याच्या कालावधीच्या नोंद घेणार आहे. ही वर्धेसाठी एक अभिमानाची बाब ठरणार असल्याचे मत संस्थाध्यक्ष दिनेश चन्नावार यांनी व्यक्त केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arnavi from wardha is all set for a record in bharatanatyam pmd 64 ssb