भंडारा : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान निर्माणाधिन पुलाच्या कामासाठी आलेली क्रेन चुलबंद नदीपात्रात अडकली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा… विदर्भातील पहिला ओडीएफ प्लस तालुका घोषित, वाचा सविस्तर
हेही वाचा… अंधूक प्रकाशामुळे नागपूरऐवजी विमान वळविले मुंबईकडे
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिह्यात अनेक लहान मोठे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर काही ठिकाणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशातच लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीतून आवळी गावात जाण्यासाठी मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या निर्माणाधिन पुलाच्या कामासाठी आलेली एक क्रेन नदीपात्रात अडकली आहे. पाणी पातळी वाढल्याने क्रेन बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागत आहेत.
First published on: 28-06-2023 at 14:26 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara the crane that is using for bridge work got stuck in the river bed ksn asj