चंद्रपूर : राज्यात फुटबॉल खेळाचा विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनीशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लब पैकी एक आहे. त्याअनुषंगाने, आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे क्रीडा नैपुण्य दाखविणाऱ्या १४ वर्षांखालील २० खेळाडूंना जर्मनीत फुटबाॅलचे धडे मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१४ व १५ फेब्रुवारी २००३ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळांनी आपल्या शाळेतील १४ वर्षांखालील मुलांच्या संघाची नोंदणी, प्रवेशिका विहित नमुन्यात ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावयाचे आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांच्यात झालेल्या करारानुसार क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन जर्मनी येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील १४ वर्षांखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत नैपुण्य कामगिरी करणाऱ्या फुटबॉल खेडाळूची कला-गुणाची दखल घेवून निवड करण्यात येणार आहे. करारनाम्यामुळे २० खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे फुटबॉलचे अद्ययावत प्रशिक्षण मिळणार आहे. तसचे त्यांच्या जाणे-येणे, निवास व प्रशिक्षण आदी बाबींवर संस्था खर्च करणार आहे. फुटबॉल खेळाडूंसाठी ही मोठी संधी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big opportunity for football players training in germany rsj 74 ysh