अनिल देशमुख यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे, त्यांना त्यांच्यावरील आरोपातून क्लिनचिट मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी बोलताना संयम ठेवून बोलावे,असा सल्ला, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल देशमुख यांना दिला. ते नागपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. तुरुंगातून सुटका झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नुकतेच नागपूरमध्ये आगमन झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ऐकावं ते नवलच! बदली होताच पोलीस अधिकाऱ्याने ‘एसी’, शौचालयाचा दरवाजाही काढून नेला

त्यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.  त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी त्यांचा व कुटुंबियांचा २१ महिने जाणीवपूर्वक छळ करण्यात आला व यामागे कोण होते याचा शोध घेतला जाईल ,असा आरोप केला. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, देशमुख यांच्या विरोधात न्यायालयात  आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  न्यायालयाने त्यांना फक्त जामीन मंजूर केला. क्लीन चिट दिली नाही. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक व संयमाने बोलावे. देशमुख गृहमंत्री असतानाही संयम सुटला होता आताही तेच चित्र दिसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state chief chandrashekhar bawankule warn anil deshmukh for his statement cwb 76 zws