नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज ऊर्फ चमत्कारी महाराजांनी दावा केलेल्या दिव्य शक्ती आणि त्या बळावरील चमत्कार यास प्रा. श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे. तर हे आव्हान स्वीकारतो पण रायपूरला या, असे प्रतिआव्हान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी श्याम मानव यांना दिले आहे. या आव्हान आणि प्रतिआव्हानामुळे सध्या बागेश्वर महाराज जोरदार चर्चेत आहेत. प्रा. श्याम मानव यांनी जे आव्हान दिले आहे. त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन तर आहेच पण त्याला महाराष्ट्रातील कायद्याचा देखील आधार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…तर आम्ही तुमचा ‘दाभोळकर’ करू, ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमकी

महाराष्ट्रात २०१३ रोजी जादूटोणा विरोधी कायदा करण्यात आला आहे. हा कायदा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. या कायद्यानुसार चमत्कार करणे, दिव्य शक्तीच्या आधारे नाव, वस्तू ओळखण्याचा दावा करण्यावर बंदी आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर ७ आणि ८ जानेवारीला दिव्य दरबार आयोजित करण्यात आले होते. हे प्रकरण जादूटोणा विरोधी कायद्यात तंतोतंत बसणारे आहे. या कायद्यानुसार कारवाई झाल्यास ५ ते ५० हजार रुपये दंड आणि सहा महिने ते सात वर्षे करावासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे गुन्ह्याला प्रतिबंधित करण्याची जबाबदारी कायद्याच्या कलम ५(२) एक, दोन नुसार दक्षता अधिकारी म्हणजे पोलीस अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenged by shyam manav for dhirendra krishna maharaj law will problem nagpur rbt 74 ysh