चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

रामदास नैताम शनिवारी गुरे चारण्याकरिता चिकमारा बिट जंगल परिसरात गेले होते.

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या उपवनपरिक्षेत्र तांबेगडी मेंढामधील चिकमारा बिट जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झाला. रामदास डुकरू नैताम (६३, रा. चिकमारा) असे मृत गुराख्याचे नाव आहे.

रामदास नैताम शनिवारी गुरे चारण्याकरिता चिकमारा बिट जंगल परिसरात गेले होते. मात्र, सायंकाळ झाली तरी ते परत न आल्यामुळे ग्रामस्थांनी उपवनपरिक्षेत्र सहाय्यक बुरांडे यांना माहिती दिली. त्या आधारे वनविभाग तांबेवाडी मेंढा चमू व चिकमारा ग्रामस्थांनी जंगल परिसरात त्यांचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत रामदास नैताम मिळाले नाही. रविवारी पुन्हा शोध घेतला असता सकाळी ७ वाजताच्या समारास त्यांचा मृतदेह आढळून आला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नागपूर : निलंबित केलेला रमी क्लबचा परवाना पुन्हा दिलाच कसा ? ; राजुऱ्यातील प्रकाराबाबत आश्चर्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी