नागपूर : काहीही झाले तरी वाघ गवत खात नाही, असे म्हटले जाते. वाघाला जंगलात शिकार नाही मिळाली तर तो गावाकडे येतो आणि पाळीव जनावरांवर ताव मारतो, पण वाघ गवत खात नाही. तुम्ही-आम्हीच काय तर सारे हेच सांगतील. मात्र, हे खरं नाही. वाघ गवत खातो हे एकदा नाही तर अनेकदा सिद्ध झाले आहे. चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोनअंतर्गत बेलारा पळसगाव गोंडमोहाळी जंगलात ‘वीरा’ या वाघिणीचा वनविकास महामंडळाचे विभागीय वनाधिकारी स्वप्नील भोवते यांनी चित्रीत केलेला असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडिओमुळे वाघ गवत खातो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अपचन झाल्यावर किंवा पोट दुखत असल्यास वाघ गवत खातो, असे वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. पर्यटकांनी वाघांना कधी तलावात तर कधी कृत्रीम पाणवठ्यात पाणी पिताना पाहिले आहे. शिकार करताना वाघाला पाहण्याचे भाग्यही अनेक पर्यटकांना लाभले आहे. विशेषकरुन ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांची ही वेगवेगळी रुपं पाहायला मिळतात आणि ते सामान्य झाले आहे. मात्र, आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. वाघ हा गवत खाताना दिसला आहे. वाघ गवत खात असल्याचे हे दृश्य पाहून लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. तुम्ही विचार करत असाल की, वाघ हा तर मांस खातो. त्यामुळे तो गवत कसे खाऊ शकतो? वाघ जंगलात असो की पिंजऱ्यात तो गवत कधीच खात नाही. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोनअंतर्गत बेलारा परिसरात वाघाने गवत खाल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वाघ गवत खात असल्याचा हा व्हिडिओ पाहून सारेच आश्चर्यचकीत होत आहेत. वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते कधी कधी वाघ हा खाल्लेले अन्न पचवण्यासाठी गवत खातो. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा हा वाघ आपली पचनक्रिया ठीक करण्यासाठी गवत खात होता. वाघच नाही तर सर्वच वन्यप्राणी वेळोवेळी गवत खात असतात. हे पचनाच्या मदतीसाठी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – मोठी घोषणा..! उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकार करणार १० लाखांपर्यंतची मदत

हेही वाचा – अर्थसंकल्पावर वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले, “ही तर काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी”

‘वीरा’ ची कथा

चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोनअंतर्गत बेलारा पळसगाव गोंडमोहाळी जंगलात ‘वीरा’ ही वाघीण कायम पर्यटकांना भूरळ घालत असते. वीरा ही वाघीण ताडोबातील ‘जुनाबाई’ आणि ‘कमकाझरी’ यांचे अपत्य. गोंडमोहाडी पळसगाव क्षेत्रात तीचा नेहमीच वास राहिला आणि पर्यटकांना ती कायम भूरळ घालत आली आहे. मोठी झाल्यानंतर ‘झायलो’ या वाघासोबत ती पर्यटकांना दर्शन देऊ लागली. काही महिन्यांपूर्वी तीने दोन बछड्यांना जन्म दिला. त्यातला एक नर तर एक मादी वाघ आहे. पर्यटकांना कधीही तिने निराश केले नाही आणि आता तर ती बछड्यांसह पर्यटकांना दर्शन देऊ लागली. बछड्यांसोबत कधी पाण्यात दंगामस्ती करताना तर कित्येकदा पर्यटनाच्या मार्गावर ती बछड्यांसह दंगामस्ती करताना दिसून आली. आता हाच वारसा तिच्या बछड्यांनाही मिळाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur tiger eat grass was observed under palasgaon buffer zone in chimur taluka rgc 76 ssb