darshan of Navadurga Two killed one injured horrific accident ysh 95 | Loksatta

अमरावती : नवदुर्गांचे दर्शन घेऊन परतणाऱ्यांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोन तरुण ठार, एक जखमी

यवतमाळ येथील नवदुर्गांचे दर्शन घेऊन धामणगावकडे परत येताना विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनासोबत झालेल्या धडकेत दुचाकीस्वारासह एकाचा मृत्यू झाला.

अमरावती : नवदुर्गांचे दर्शन घेऊन परतणाऱ्यांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोन तरुण ठार, एक जखमी
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अमरावती : यवतमाळ येथील नवदुर्गांचे दर्शन घेऊन धामणगावकडे परत येताना विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनासोबत झालेल्या धडकेत दुचाकीस्वारासह एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी यवतमाळ-धामणगाव मार्गावर नांदुऱ्याजवळ घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. मयुर शंकरराव नेवारे (२६) व प्रणय वानखडे (२५) अशी मृतांची, तर रुद्र अतुल राऊत (१५) असे गंभीर जखमी युवकाचे नाव असून ते तिघेही धामणगाव येथील अमर शहीद भगतसिंग चौक परिसरातील रहिवासी आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : अकोल्यात घराच्या अंगणात लावली गांजाची झाडे; राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

यवतमाळ येथील नवदुर्गा उत्सव पाहण्याकरिता हजारो भाविकांची रीघ लागली आहे. देवीच्या दर्शनासाठी मृतक मयुर, प्रणय व जखमी रुद्र हे तिघे दुचाकीने शनिवारी (दि. १) रात्री यवतमाळ येथे गेले होते. दरम्यान, रविवारी सकाळी ते धामणगाव रेल्वेकडे परत येत असताना यवतमाळ-धामणगाव मार्गावर नांदुरानजीक विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनाने मयुर नेवारे याच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत मयुरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा पूर्णतः चक्काचूर झाला. अपघातातील गंभीर जखमी प्रणय वानखडे याला उपचाराकरिता सेवाग्राम येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमी रुद्र राऊत याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाभुळगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत. यवतमाळ-धामणगाव रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर सुसाट वाहन चालविणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली. याच यवतमाळ-धामणगाव मार्गावर दोन दिवसांपूर्वी मालवाहू आणि दुचाकीच्या अपघातात सावळा येथील दोन युवकांचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नागपूर : स्मार्ट सिटीच्या कामातून ‘शापूरजी’ला वगळले; कामात दिरंगाई भोवली

संबंधित बातम्या

वाशीम: ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाचा स्वपक्षीय महिला नेत्यावर चाकू हल्ला; जिल्हा प्रमुखास अटक
शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भाचे लक्ष्य, ‘मॉडेल व्हिलेज’च्या माध्यमातून बदल घडवणार ; डॉ. शरद गडाख
विमानतळ विकास कंत्राट रद्द करण्याची सरकारची भूमिका संशयास्पद
गर्भवतींमधील अनियंत्रित मधुमेह बाळासाठी धोक्याचे – पद्मश्री डॉ. विरास्वामी शैषया यांचे मत
मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा; समाजमाध्यमांवरील संदेशाने दहशत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
कर्तव्यपालनास प्राधान्य द्या!; संविधानदिनी पंतप्रधान मोदींचे आवाहन
Shraddha Walker murder case: पोलिसांना डीएनए चाचणी अहवालाची प्रतीक्षा