नागपूर: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर देशभरात ‘ईव्हीएम’चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महायुतीचे सरकार ‘ईव्हीएम’मुळे आल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होय, आमचे सरकार ‘ईव्हीएम’चे सरकार असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले आहे. पण यावेळी फडणवीसांनी त्यांच्या ईव्हीएमचा अर्थही सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांचाही समाचार घेतला. ईव्हीएमवरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, विरोधकांकडून ईव्हीएमबाबत नॅरेटिव्ह तयार केला जात आहे. आम्ही त्याला चर्चेदरम्यान उत्तर देऊ.

हेही वाचा – जेव्हा मंत्री माहिती कार्यालयच्या गाडीत बसून मंत्रिमंडळ बैठकीत जातात

आज आमच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. ज्यामध्ये सहा राज्यमंत्री आहेत, आजपासून आमच्या गतिशील कारभार सुरु झालेला आहे. या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा, पुरवणी मागण्यांवरती चर्चा, सत्तारूप पक्ष आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावाची चर्चा आणि त्यासोबत जवळपास २० बिले येणार असे फडणवीस यांनी सांगितले.

मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते, त्यांचे बिल आणले जाणार आहेत. चांगले कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षाने एक पत्र दिले असून मागच्या अधिवेशनातले ते पत्र आहे. फक्त एक ईव्हीएमचा नवा मुद्दा आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले होते. महाराष्ट्रामध्ये एक गतिशील सरकार आणायचा आमचा प्रयत्न आहे. आमचे सरकार हे ईव्हीएमचे सरकार आहे कारण त्या ईव्हीएमचा अर्थ एव्हरी व्होट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र असा आहे. सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षांचे रेकॉर्ड तोडले. इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी चाललेली आहे असे फडणवीस म्हणाले.

हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे सरकार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तसूभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही. आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्याप्रमाणे हे सरकार काम करेल. संविधानाचा गौरव करेल हा विश्वास यानिमित्ताने मी देतो असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – कमी संख्याबळाचा वारंवार उल्लेख, विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न

ईव्हीएम म्हणजे?

आमचे सरकार ईव्हीएमचे सरकार असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, आमच्यासाठी ईव्हीएमचा अर्थ एव्हरी व्होट फॉर मॅगनेटिक महाराष्ट्र असा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्रासाठी मतदान केले आहे. तो महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पुढील काळात कारभार करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis evm statement cabinet meeting press conference nagpur winter session dag 87 ssb