वर्धा: येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठातील वादाने नवेच वळण घेतले आहे. कुलगुरू पदावर प्रा. रजनीश कुमार शुक्ल हे रुजू झाल्यानंतर प्राध्यापक वर्गातील गटबाजी उफाळून आली. त्यातच सोशल मीडियावर गत महिन्यात कुलगुरू व विद्यापीठातीलच एका महिलचे चॅटिंग गाजले. ते अत्यंत आक्षेपार्ह असूनही त्याचा खुलासा मात्र झाला नसतानाच आता खुद्द कुलगुरू शुक्ल हे नव्या वादात अडकले आहे. त्यांनी व अन्य एका महिलेने मच्छर मारण्याचे गुडनाईट हे विषारी औषध प्राशन केल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोघांनी एकाच वेळेस हे विष प्राशन केल्याची बाब रुग्णालयात दाखल झाल्याने स्पष्ट झाली. आता तसा वैद्यकीय अहवाल पण आल्याच्या महितीस एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. त्यांचा संपर्क होवू शकला नाही. मात्र विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बुद्धदास मिरगे हे म्हणाले की कुलगुरू शुक्ल हे प्रकृती बिघडल्याने सावांगीच्या रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामागचे कारण कळू शकले नसल्याचे मिरगे सांगतात. तर विद्यापीठ परिसर अधिकार क्षेत्र असलेल्या रामनगर पोलीसांनी कुलगुरू व एका महिलेने विषप्राशन केल्याची नोंद झाली आहे. तशी माहिती सावंगी पोलिसांकडून प्राप्त झाली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion about a woman taking poison with the vice chancellor of a hindi university in wardha pmd 64 dvr