गोंदिया : जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व शाळा ३० जूनपासून सुरू करण्याच्या सूचना शासनाने जाहीर केल्या आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे असताना जिल्ह्यातील काही खाजगी संस्थाकडून १२ जूनपासूनच शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर काही शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी काही सामाजिक संस्थाकडून करण्यात आल्यानंतर शिक्षण विभागाकडून या शाळांना ३० जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्याची ताकीद पत्राद्वारे दिली आहे. मृग नक्षत्रात मान्सून लांबणीवर गेल्याने उन्हाच्या तीव्र झळांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सूर्य सातत्याने आग ओकत असल्याने जनजीवन होरपळत असताना याचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे.

हेही वाचा – नागपूर: माझी मैत्रिण स्वर्गात माझी वाट बघत आहे; मैत्रिणीच्या आत्महत्येपाठोपाठ युवतीची आत्महत्या

शासनाकडून विदर्भातील सर्व शाळा ३० जूननंतर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. असे असताना जिल्ह्यातील काही खासगी शाळांनी १२ जूनपासून शाळा सुरू केल्या. त्यामुळे भर उन्हात विद्यार्थ्यांवर शाळेत जाण्याची नामुष्की ओढवली, हा सर्व प्रकार पाहता जिल्ह्यातील काही सामाजिक संघटनांनी शाळांच्या या अरेरावी प्रकाराबद्दल विरोध करीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवून या शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून पत्र जाहीर करून या शाळाना देण्यात आला आहे.

हेही वाचा – नागपूर : शाळकरी मुलगी चार महिन्यांची गर्भवती; सत्य समजताच आईच्या पायाखालची जमीन सरकली

पत्र मिळताच शाळा बंद

जिल्ह्यातील सर्व शाळा ३० जूनपूर्वी उघडण्यात येऊ नये, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्यानंतर व सदर पत्र शाळांना प्राप्त होताच सुरू झालेल्या खाजगी शाळांनी आपल्या शाळा तूर्तास बंद केल्याची माहिती आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

गोंदिया शहरातील काही खाजगी शाळा १२ जूनपासून सुरू झाल्या व काही शाळा पुन्हा सुरू होण्याच्या तयारीत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्याने शिक्षणाधिकारी (प्राथ) डॉ. महेंद्र गजभिये व शिक्षणाधिकारी (माध्य) कादर शेख यांनी १५ जून रोजी पत्र काढून सुरू असलेल्या शाळा बंद करून ३० जूनपूर्वी कोणतीही शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार नाही व तसे आढळल्यास शाळेवर कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सर्व गटशिक्षणाधिकारी व प्राचार्य / मुख्याध्यापक खाजगी शाळांना दिल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education department warns private schools to take action if schools start before june 30 sar 75 ssb