नागपूर : आरोग्य विभागअंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्ज सादर करण्यासाठी २९ ऑगस्टपासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा – भारतात गोसेवा व गोरक्षण समजून सांगावे लागत आहे, हेच वेदनादायी; संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची खंत

हेही वाचा – ऋषिपंचमीनिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; साडेचारशे दिंड्या दाखल

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधीपण २२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही आयुक्त आरोग्य सेवा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of time to apply for health department recruitment applications can be made till this date dag 87 ssb