धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी २२ योजना, अंमलबजावणीचे आदेश

सरकारने ३० जून २०१९ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी समाजासाठी ज्या योजना आहेत त्या योजना धनगर समाजासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी २२ योजना, अंमलबजावणीचे आदेश
(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी तत्कालिन फडणवीस सरकारने लागू केलेल्या विविध २२ योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने जिल्हाधिकारी आणि संबंधित खात्याच्या आयुक्त, उपायुक्तांना दिले आहे.

महायुतीच्या सरकारने ३० जून २०१९ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी समाजासाठी ज्या योजना आहेत त्या योजना धनगर समाजासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि  महाविकास सरकार आले. त्यामुळे त्या योजना थंडबस्त्यात गेल्या होत्या. आता परत त्या योजनांची अंमलबजावणी व्हावी म्हणून ओबीसी खात्याने आदेश काढले आहे. यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केले आहे. ‘जे-जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला’ या धोरणाअंतर्गत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी लागू केलेल्या २२ योजना लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मागील सरकारने त्याची अंमलबजावणी केली नव्हती, असे पडळकर म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चंद्रपूर : ‘फेसबुक’द्वारे मैत्री, प्रेम अन् दगा…; तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर केले व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी