बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील आणि राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या देऊळगाव मही येथे रविवारी लागलेल्या भीषण आगीत चार दुकानातील विविध साहित्याची मोठी हानी झाली. या भीषण दुर्घटनेत तीस ते पस्तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेने जबर मानसिक धक्का बसलेल्या एका दुकानदाराची प्रकृती बिघडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुकान ओळीतील चिखली- जालना मार्गावर संदीप किराणासह अन्य तीन दुकानाला आज २३ मार्च रोजी रविवारला अचानक भीषण आग लागली.या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.ही शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या आगीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. शिवाजी विद्यालया समोर विजय श्रीराम शिंगणे यांच्या मालकीचे संदीप होलसेल व चिल्लर विक्रीचे किराणा दुकान आहे. संजय प-हाड यांचे फायबर फर्निचर दरवाजे विक्रीचे दुकान तसेंच शेख.नसीम यांचे सायकल स्टोअर व सुनिल शिंगणे यांचे गोळ्या बिस्कीट अंडे, पाणी होलसेल विक्रीचे दुकान आहे. संदीप किराणा दुकानासह अन्य तीन दुकानें लागूनच असल्यामुळे कुठल्यातरी एका दुकानात शॉट सर्किट झाले असावे असा अंदाज आहे. हळू हळू आगीने पेट घेतल्याने आग पसरली. भीषण आगीत रूपांतर होऊन काही क्षणातचं होत्याचे नव्हते झाले.चारही दुकानातील किराणा माल, नव्या जुन्या सायकल,टायर,ट्यूब मोटार सायकल टायर ट्यूब रिंगा फर्निचर दरवाजे, गोळ्या बिस्कीट पाणी बॉटल यासह अनेक साहित्य जळून खाक झाले आहे. याप्रसंगी आग विझाविण्यासाठी पाण्याच्या टँकरच्या मदतीने गावातील नागरिकांनी मोठ्या धाडसाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन गाडीला देखील पाचरण करण्यात आले होते. महसूल विभागाचे तलाठी संदीप वायाळ यांनी घटना स्थळचा पंचनामा केला असून प्राथमिक पंचनाम्यात अंदाजे तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. नुकसान ग्रस्त दुकान मालकाला शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

दुकान मालकाची प्रकृती बिघडली

अचानक लागलेल्या आगीमुळे किराणा दुकानातील किराणा माल व साहित्य पूर्णपणे आगीत जळून खाक झाल्याचे पाहून विजय श्रीराम शिंगणे (वय ४५) यांना चांगलाच धक्का बसला. त्यांना छातीमध्ये तीव्र वेदना जाणू लागल्या होत्या.त्यांच्यावर प्राथमिक देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी जालना हलवण्याचे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana fire breaks out at deulgaon scm 61 css