नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील परीक्षेच्या गुणांकनावर काय परिणाम होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. आयोगाने स्पर्धा परीक्षा प्रमाणेच इतर सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी आता गुणांकणाची कुठली प्रक्रिया लागू होणार यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. आयोगाच्या परिपत्रकात कुठली माहिती देण्यात आलेली आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पोलीस उपनिरीक्षक अशा विविध परीक्षांसह सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये ग्रुप क पदांचा समावेश असतो. आयोगाने त्याच्या परिपत्रकांनुसार यापुढे स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरिता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागू करण्यात आला आहे.

आयोगाच्या कार्य नियमावलीतील नियम क्रमांक ८ (vi) संदर्भात दिनांक १३ जानेवारी, २०२१ रोजीच्या सुधारणेसह स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठी देखील किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय आयोगामार्फत घेण्यात आला आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच, सदर निर्णय आयोगाकडुन यापुढे घेण्यात येणा-या चाळणी परीक्षांना लागू असेल . पर्सेंटाईल ही प्रणाली उमेदवाराच्या गुणांची तुलना इतर सर्व उमेदवारांच्या गुणांशी करते आणि त्या उमेदवाराने किती टक्के उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे हे दर्शवते. 

पर्सेंटाइल म्हणजे काय?

पर्सेंटाइल म्हणजे ० ते १०० पर्यंतची संख्या जी दर्शवते की विशिष्ट डेटा पॉइंटच्या किती टक्के मूल्ये खाली आहेत. उदाहरणार्थ, जर एखाद्या उमेदवाराची टक्केवारी ९० असेल, तर त्याचा अर्थ असा की त्याने किंवा तिने इतर ९०% उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली. 

एमपीएससीमध्ये पर्सेंटाईलचा वापर:

एमपीएससी परीक्षेत, प्राथमिक आणि मुख्य परीक्षेचे गुण सामान्य करण्यासाठी पर्सेंटाइलचा वापर केला जातो, विशेषतः जेव्हा परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेतली जाते. यामुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना योग्य वागणूक मिळते याची खात्री होते. 

उदाहरण:

समजा एका परीक्षेत १००० उमेदवार आहेत आणि एका उमेदवाराला ८०% गुण मिळाले आहेत. जर ७०० उमेदवारांनी त्या उमेदवारापेक्षा कमी गुण मिळवले असतील, तर त्या उमेदवाराचे टक्केवारी ७० (७००/१००० * १०० = ७०%) असेल. याचा अर्थ असा की उमेदवाराने ७०% उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली. पर्सेंटाइल सिस्टीममुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना योग्य वागणूक मिळते याची खात्री होते.