भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत एका ज्येष्ठ पत्रकारास सुपारीबाज संबोधून पत्रकारांचा अवमान केला. याप्रकरणी चित्रा वाघ यांना समज देवून त्यांच्यावर कारवाई करावी आणि वाघ यांनी समस्त पत्रकारांची माफी मागावी, यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना यवतमाळ श्रमिक पत्रकारांसह सर्व पत्रकारांच्या वतीने पत्र पाठविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निषेधार्थ शनिवारी येथे आयोजित सभेत यवतमाळच्या पत्रकारांनी हा निर्णय घेतला. पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांच्यासोबतच भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आ. अशोक उईके, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. निलय नाईक यांनीही पत्रकारांवर तोंडसुख घेऊन दोषारोप केले. वाघ यांच्या समवेत असलेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पत्रकारांना बघून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे वाद वाढला. ही खडाजंगी सुरू असताना पत्रकार परिषदेत पोलीस शिरले. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा हात पकडून त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: मला मते द्या, अथवा देऊ नका, मी कामे करतच राहणार; नितीन गडकरी

या सर्व घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी यवतमाळातील सर्व पत्रकारांनी विश्राम भवन येथे बैठक घेऊन चित्रा वाघ यांच्यासह भुतडा व उपस्थित आमदारांचा निषेध नोंदविला. बैठकीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांची भेट घेऊन पत्रकार परिषदेत पोलीस कोणी बोलाविले, याची चौकशी करण्याची मागणी केली. अधीक्षक बन्सोड यांनी या प्रकरणात पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास समज देण्याची ग्वाही दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalists demand action against chitra wagh in yavatmal jp nadda and chandrshekahr bawankule tmb 01