मेट्रोच्या दोन नव्या मार्गिका सुरू होताच दुसऱ्याच दिवशी मेट्रोच्या प्रवासी संख्येने एक लाखाचा टप्पा पार केला. मात्र वर्धा ,हिंगणा मार्गावर फीडर सेवेचा प्रश्न कायम आहे.सोमवारी मेट्रोच्या सर्व चारही मार्गावर एकूण १ लाख ३४० प्रवाशांनी प्रवास केला. रविवारी कामठी मार्ग (ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत) आणि सेंट्रल एव्हेन्यू (प्रजापती नगर) मार्गेकेंचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर: पंतप्रधानांच्या हस्ते इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनाची परंपरा खंडित होणार?

त्यानंतर सर्व चारही मार्गिकेवर मेट्रो सेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी दोन नवीन मार्गिकांसह पूर्वीच्या दोन (खापरी व लोकमान्यनगर) मार्गिकांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. रविवारी एकूण ७९,७०१ प्रवाशांनी प्रवास केला होता. सोमवारी सांयकाळी सहापर्यंत ही संख्या एक लाख ३४० वर गेली. यापूर्वी १५ ऑगस्ट २२ ला ९०,७५८ ,५ ऑक्टोबर २०२२ ला ८३,८७६ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamathi marg and central avenue this two new lines of metro started cwb 76 amy