मॉडेलिंग करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणींना देहव्यापाराच्या दलदलीत ढकलून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याने एका मोठ्या हॉटेलमध्ये आंबटशौकिन ग्राहकांकडे तरूणीला पाठवत असल्याचे उघडकीस आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : एक फुल दो माली! तरुणीच्या दोन प्रियकरांमध्ये तुफान हाणामारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दलाल विक्की राजू कदमवार (३१, हुडकेश्वर) हा गेल्या अनेक वर्षांपासून देहव्यापारात मोठा दलाल आहे. त्याने अनेक अल्पवयीन  मुलींना देहव्यापारात ढकलले मध्यप्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यातील २१ वर्षीय तरुणीला त्याने मुंबईत अनेक चित्रपट निर्मात्याशी ओळख असल्याचे सांगून तिला जाळ्यात ओढले. नागपुरातील मनिषनगरातील डेस्टिनी हॉटेलमध्ये ठेवले.  तिच्याकडे  ग्राहक पाठवून देहव्यापार करवून घेत होता. तिचे  अश्लील छायाचित्र काढले. ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन देहव्यापार करण्यास भाग पाडले.

हेही वाचा >>> नागपूर : “ही” आहे महाराष्ट्रातील पहिली “व्हॅलेंटाईन” तुम्हाला माहिती आहे का ?

असा ठरला तरुणीचा सौदा प्रतिग्राहकांसाठी १० हजार रुपये असा सौदा विक्की ठरवित होता. त्यापैकी तरुणीला एक हजार रुपये देण्यात येत होते तर ९ हजार रुपये विक्की ठेवत होता. गुन्हे शाखेच्या निरीक्षक शुभांगी वानखडे यांनी छापा घालण्यापूर्वी बनावट ग्राहक  हॉटेलमध्ये पाठवला. सौदा ठरवल्यावर दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी छापा घालून तरुणीला ताब्यात घेतले व विक्कीला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for forcing girl into prostitution in the name modelling adk 83 zws