वर्धा : मेघे अभिमत विद्यापीठाच्या गणेशोत्सव पर्वावर आयोजित विदर्भस्तरिय गीतगायन स्पर्धेत वर्ध्याचा मयूर पटाईत हा अव्वल येत स्वरवैदर्भी पुरस्काराचा मानकरी ठरला. एकूण ८३ गायक स्पर्धेत पात्र ठरले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संस्थेचे प्रशासकीय महासंचालक डॉ. राजीव बोरले, डॉ. उदय मेघे, संयोजक संजय इंगळे तिगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन फेऱ्यांनंतर झालेल्या महाअंतिम फेरीत गायकांनी आपल्या आवडीची गाणी म्हटली. तीनही फेरीत उत्कृष्ट ठरलेल्या पटाईत यास २२ हजार रुपयांचा प्रथम, कैथवास यास १५ हजार रुपयांचा द्वितीय तर चिंचोलकर यास ११ हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा – बुलढाणा : अतिवृष्टीचा नांदुरा तालुक्याला जबर फटका, ११६ कुटुंब निराधार; २६ घरांची पडझड, जनावरांची दैना

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांनी खरंच नागपुरात अरेरावी केली? भाजपानं ‘तो’ Video केला ट्वीट, काँग्रेसवर टीकास्र!

प्रोत्साहनपर पुरस्कार तेजस्विनी खोडस्कर, वृषभ लोनबळे, धनश्री जैन, प्रशांत श्यामकुंवर, कुमोद रायपूरे, वासुदेव धाबेकर, समीक्षा हटवार, रीता खोडे, गजानन वानखेडे यांना प्राप्त झाले. पुरस्कार वितरण डॉ. आशिष अंजंकर, संगीततज्ञ राजू बुडखले, शेख मोबिन, चारुलता पांडे, संगीता इंगळे, अभय जारोंदे यांच्या हस्ते झाले. चारू साळवे, प्रवीण काळे, अशोक टोकळवर, दिनेश गवई, सुभाष वानखेडे, नितीन अहिरे, रवी ढोबळे, स्वप्नील चरभे यांचे वाद्य सहकार्य लाभले. पल्लवी पुरोहित यांनी संचालन केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayur patait top vidarbha level singing competition of meghe abhimat university wardha pmd 64 ssb