नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट- क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा १७ डिसेंबरला होणार आहे. याच दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी पदाची परीक्षाही होणार आहे. या दोन्ही परीक्षांसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केला असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. एकाच दिवशी परीक्षा झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना कुठल्याही एक परीक्षेला मुकावे लागणार असल्याने तारखेत बदलाची मागणी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अराजपत्रित गट-ब व गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल १२ सप्टेंबरला जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी १७ डिसेंबरला होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी अर्जही केले. आता याच तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी पदाची परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षांचा दिवस आणि वेळही एकच आहे. त्यामुळे उमेदवारांची अडचण वाढली आहे.

हेही वाचा – बुलढाण्यात केंद्रीय विद्यालय स्थापनेच्या हालचाली, जागेचा शोध युद्ध पातळीवर

हेही वाचा – गोंदियात नामांकित कंपन्यांची २२६ बनावट घड्याळे जप्त

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या अनेक उमेदवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्रिकी पदाच्या परीक्षेसाठीही अर्ज केले आहेत. आता दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने उमेदवारांना कुठलीही एकच परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची अडचण वाढली आहे. अनेक उमेदवारांचा गोंधळ होणार असल्याने परीक्षेच्या तारखेत बदल करावा अशी मागणी समोर येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc and pwd exam on the same day confusion of candidates dag 87 ssb