नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे थेट सेवा प्रवेशाद्वारे भरण्यात येत आहे. या संदर्भात २२ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रकाशित झाली होती व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
सदर जाहिरातीनुसार, सर्व उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेची तारीख, शिफ्ट आणि वेळ खालीलप्रमाणे आहे. तसेच, वरील पदांच्या ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉल तिकीट २०२५) नागपूर महानगरपालिकेच्या http://www.nmcnagpur.gov.in वेबसाइटवरील नवीन भरती या लिंकवर १.१०.२०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच, उमेदवारांनी वरील लिंकवर ऑनलाइन अर्ज भरताना वापरलेला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड नमूद करून ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळवावे.
परीक्षेत वेळापत्रक ७ ऑक्टोबरला- कनिष्ठ लिपीक, लेखापाल, डैटा ऑपरेटर- सकाळी ९ ते ११, दुपारी १ ते ३ या वेळेत – कनिष्ठ लिपीक, ग्रंथालय सहाय्यक, दुपारी ३ ते ७ या वेळेत -सिस्टीम एनालिट, विधी सहाय्यक या पदासाठी ऑनलाईन परीक्षा होईल.
त्याच प्रमाणे ८ ऑक्टोबर ला सकाळी ९ ते ११ दरम्यान कर संग्रहक , प्रोगरामर आणि स्टेनोग्राफर या पदासाठी दुपारी १ ते ७ दरम्यान करसंग्रहक, हार्डवेअर इंजिनिअर आणि करसंग्रहक यांच्या ऑनलाईन परीक्षा होतील.
