संघ, हिंदू महासभेकडून पाठबळ; तुषार गांधी यांचा आरोप
राष्ट्रपिता म. गांधींवर गोळ्या जरी नथुराम गोडसे याने झाडल्या तरी त्याला याची प्रेरणा सावरकर यांच्याकडून मिळाली व त्याला पाठबळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभेने दिले होते, असा आरोप गांधीजींचे पणतू ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक तुषार गांधी यांनी केला. त्यांनी यासाठी अनेक दाखलेही दिले.
युवा जागर आणि धनवटे नॅशनल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंकाळी ‘गांधी हत्येमागील षडयंत्राचे सत्य’ या विषयावर महाविद्यालयाच्या प्रांगणात तुषार गांधी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गांधीजींच्या हत्येचे समर्थन करताना नथुराम गोडसे समर्थक व हिंदूत्ववादी संघटनांकडून उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्याला स्पर्श करताना ते कसे खोटे आहेत, हे त्यांनी मुद्देसूदपणे सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-02-2016 at 02:59 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nathuram godse inspire from savarkar for mahatma gandhi murder